The Punekar PodcastIdeabrew Studios
शेती आधारित उद्योग उभा करणे हे मोठे आव्हान असते. शेतीलाच उद्योग मानून उत्पादने विकसित करणे हे त्याहून मोठे आव्हान. संजीवके, खते, किटकनाशके, बियाणे यांमधील सखोल ज्ञान, अफाट शेतकरी संपर्क आणि १८ वर्षांचा अनुभव असणारे माना आणि उत्तम जनसंपर्क कौशल्य व मार्केटिंगमध्ये उच्चशिक्षण असलेला भाचा, अशी जोडी उद्योगात उतरल्यानंतर अल्पावधीतच बिझनेसला कोठून कोठे नेऊ शकतात याचे आगळे उदाहरण गजानन जाधव व शंतनू मोगल यांनी बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स प्रा.लि. (छत्रपती संभाजीनगर) या उद्योगाच्या माध्यमातून दाखवून दिले.
Step into an infinite world of stories
English
India