Step into an infinite world of stories
4.8
Biographies
‘टाटा स्टील’चा इतिहास अनेकविध घटनांनी भरलेला आणि रंजक असा आहे. ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या काही दशकांतील आणि नवस्वतंत्र भारतातील अनेक घटना आणि घडामोडींशी कंपनीचा इतिहासही बांधला गेला आहे. रुसी लालांनी ‘टाटा स्टील’चा हा शंभर वर्षांचा इतिहास अनेक बारकाव्यांसह टिपला आहे. कंपनीचे संस्थापक जमशेदजी टाटांची दृष्टी आणि त्यानुसार कंपनीचा विकास आणि विस्तार करणाऱ्या सर दोराब टाटा आणि जेआरडी टाटा यांचे परिश्रम यासंबंधी अनेक तपशील त्यात आले आहेत. रुसींनी पुस्तकात कंपनीच्या कामातील मानवी बाजू अत्यंत वाचनीय आणि समर्पक पद्धतीने मांडली आहे. कंपनीची खरी शक्ती तिथल्या लोकांच्या निर्धारात आणि जिंकण्याच्या ध्यासातच कशी सामाविली आहे, याचीही नेमकी जाणीव या पुस्तकातून व्यक्त झाली आहे हे पुस्तक म्हणजे कंपनीच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा मौल्यवान, महत्त्वपूर्ण आणि वाचनीय असा दस्तऐवज आहे.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9789388740340
Translators: विश्राम ढोले
Release date
Ebook: 7 April 2021
English
India