Nivdak Chimanrao CV Joshi
Step into an infinite world of stories
4
Short stories
बंडू:एक उत्साही पण भाबडा प्राणी. मध्यम वयाचा पण बाळसेदार शरीराचा. हृदय सुपाएवढे पण डोके बेताचेच. चरितार्थ चालतो सनबीम आणि रेनबो कंपनीतून मिळणाऱ्या पगारावर. पण जगतो मुख्यतः स्वतःविषयीच्या गोड गैरसमजाच्या इंद्रधनुष्यावर. बहुधा फसतो पण क्वचितच खचतो. कारण आपण फसलो हे बहुधा त्याच्या ध्यानातच येत नाही. भाबडा असल्यामुळेच की काय तो दैवाचा लाडका आहे. ते त्याला नेहमीच अडचणीत टाकून आपली करमणूक करून घेत असते, पण दगा क्वचितच देते.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9789388740654
Release date
Ebook: 6 May 2021
English
India