Step into an infinite world of stories
4.8
Short stories
आयुष्यभर आपल्याला माणसं भेटतात ती हे करून पाहा, ते करून पाहा, असं करा, तसं करा वगैरे अनाहूत सल्ला देणारी. 'हे करून पाहू नका' असा विक्षिप्त सल्ला एखाद्या खट्याळ, खोडकर विनोदकारच देऊ शकतो. त्याला खाद्य पुरवणारे लोक तरी जगण्यासाठी काय काय करून बघतात? आहार-आरोग्य यांचं अवास्तव स्तोम माजवतात. हिरीरीनं वाद घालतात. बालसंगोपनाबद्द्ल भलभलते भ्रम बाळगतात. म्हातारपणाच्या नावाखाली कामं चुकवून मस्त जिभेचे चोजले पुरवून घेतात. व्यायामासाठी फिरायला जाऊन शॉर्टकटनं परत येतात. मनातल्या मनात मराठीपण जपतात आणि जनात त्यांचं सीमोल्लंघन करतात. हे सगळं करताकरता कधी थकतात, कधी फसतात, कधी हरतात. तरीही हिरीरीनं जगतात. जगण्याच्या ह्या धकाधकीचा ताण कमी करण्यासाठी त्यांना हाताशी अशीच प्रसन्न खेळकर पुस्तकं लागतात. 'हे करून पाहू नका' हे पुस्तक मात्र त्यासाठी जरूर वाचून पाहा
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9789390172344
Release date
Ebook: 6 May 2021
Tags
English
India