Step into an infinite world of stories
4.3
Biographies
शाळा, कॉलेज, किंवा अगदी फेसबुकवरही तुम्ही गांधी आणि सावरकरांच्या इतिहासाबद्दल तावातावाने चर्चा करता? इतिहासाचे दाखले देत मुद्दयांवर भांडता? बोलत, भांडत असाल तर तुमचं काहीही चुकत नाहीये...कारण हे दोन महापुरुष भारतात किंवा जगभरातही चर्चांच्या बाबतीत सगळ्यात हिट आणि ट्रेंडिग असतात, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल, त्यांच्या राजकीय इतिहासाबद्दल, धर्मचिंतनाबद्दल तपशीलात जाणून घेण्यासाठी थोड्या व्यासंगाचीही गरज आहे. आता त्यासाठी लायब्रऱ्यांमध्ये जाऊन तास न तास पुस्तकात डोकं खूपसून बसण्याची गरज अजिबात नाही. सो, तुमचा व्यासंग वाढवण्यासाठीच हे ऑडियोबुक. काय आहे यात? महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी परस्परभिन्न. तसंच त्यांचं धर्माबाबतचं चिंतनही. गांधीजींनी कधी स्वत: हरिजनांसोबत मैला सफाईचं काम केलं तर सार्वजनिक आयुष्यात सविनय कायदेभंग, असहकार, सत्याग्रह ही आयुधं वापरली. हिंदू धर्माबाबतची त्यांची बैठक सर्वसमावेशक होती, त्यातूनच त्यांनी अनेक राजकीय कृती-कार्यक्रम, आयुधं विकसित केली. सावरकर जहाल राष्ट्रवादी. त्यांचा विज्ञानवाद, राष्ट्रवाद, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हे सारं त्यांच्या धार्मिक चिंतनाच्या बैठकीतून आलेलं. या दोन्हीही महापुरुषांच्या धर्मविषयक चिंतनाचा, विचारांचा वि.ग. कानिटकरांनी घेतलेला सखोल आढावा समजून घेण्यासाठी नक्की ऐका ‘धर्म महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा’ आणि ऐकल्यावर तुमच्या मित्र मैत्रिणींशी घमासान चर्चा करायलाही विसरू नका!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354347016
Release date
Audiobook: 16 December 2021
English
India