Step into an infinite world of stories
जिथे मन भयमुक्त आहे.... मस्तक झुकलेलं नाही..... जिथे ज्ञानाचे मुक्तद्वार आहे.......... जिथे संकुचितपणाच्या भिंतींनी जगाचे तुकडे पडलेले नाहीत. जिथे शब्दांचा जन्म सत्यातून होतो...... जिथे अविरत परिश्रमाने पूर्णत्व प्राप्त करण्याची ताकद येते...... जिथे प्रज्ञेचा निर्मळ निर्झर रूढींच्या कोरड्यारूक्ष वाळवंटात लोपलेला नाही..... जिथे मन विकसित होऊन त्याचे आचार विचार समृध्द होत आहेत, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गलोकात हे परमपित्या, माझा देश जागृत होवो.....! रवीन्द्रनाथांच्या प्रत्येक शब्दातून कविता व्यक्त होते. बंगाली साहित्य, संगीत, नृत्यकला, चित्रकला, नाटक, कादंबरी, कथा, कविता, प्रवासवर्णने, राजकारण, तत्वज्ञान, शिक्षण अशा सर्व क्षेत्रांत लीलया मुसाफिरी करणारे रवीन्द्रनाथ टागोर यांची ओळख गीतांजली या काव्यसंग्रहातून सर्व जगाला झाली आणि जगानेही त्यांच्या कवित्वाचा सन्मान केला.
Release date
Audiobook: 24 June 2022
Tags
English
India