Hasgat Dilip Prabhavalkar
Step into an infinite world of stories
"विनोद हा जीवनातील असंख्य दुःखांवरचा जालीम इलाज आहे '', “' विनोद ही साहित्यातील अहिंसा आहे, '' असे आचार्य अत्रे म्हणत. अगदी सहजगत्या हसत हसत विनोदाच्या साहाय्याने इतरांच्या दोषांवर बोट ठेवता येते. मराठीतील अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यात विनोदाचा असा मार्मिक उपयोग केला आहे.'राम गणेश गडकरी यांनी 'बाळकराम' बनून समाजातील दांभिक प्रवत्तीला आपल्या विनोदी लेखातून रेशमी चिमटे काढले. त्यासाठी त्यांनी ' कवींचा कारखाना ' उघडला; ' ठकीच्या लग्ना 'ची मोहीम उघडली. अनेकदा विनोदाच्या मदतीने जीवनातील दुःखाची तीव्रता कमी करता येते.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9788195312405
Release date
Audiobook: 23 December 2021
Tags
English
India