Step into an infinite world of stories
वाचकांच्या प्रतिक्रिया
एक छोटीशी कादंबरी आणि रोजनिशी!!! सहज समोर दिसली म्हणून वाचायला सुरुवात केली आणि संपवूनच उठले... सहज आणि फारसा फाफटपसारा नसलेलं असं काहीतरी खूप दिवसांनी वाचनात आलं. मुख्य म्हणजे या कादंबरीचा फाॅर्म आवडला म्हणजे डायरी वाचता वाचता कथानक उलगडत जातं!! पात्रांची, त्यांच्या जाणिवा-नेणिवांची, त्यांच्या मनात आणि शरीरात सुरू असलेल्या मूक आक्रंदनाची ओळख आपोआप होत जाते. सगळेच जण काही ना काही नात्याने (खरंतर मैत्रीच्या नात्याने) जोडले गेलेले! त्यांचे दृश्य अदृश्य बंध दाखवताना लेखकाने कमीतकमी शब्दांचा वापर केलेला आहे. प्रस्तावनेला पाचशे शब्द असली भानगड नाही. योगिता जाधव तुमच्या दोन्ही कादंब-या वाचल्यात. पहिल्यांदा जंजाळ नंतर लुप्त. सुलूचे गारूड मनावरून उतरत नाही तोवर साम ने मनाचा ताबा घेतला. सुलू एक सामान्य मुलगी. तिच्या कहाणीत तसे चढउतार फारसे नाहीत.तरी हळूहळू होणारे तिच्यातील मानसिक, भावनिक बदल, शारीरिक गरजा, तिचे समलैंगिकत्व स्वीकारणे हा जो प्रवास तुम्ही ज्या सहजतेने चितारलाय अगदी काबिले-तारीफ आहे. तुमच्या कादंबरीने फार पुर्वीच्या दीपा मेहताच्या fire या चित्रपटाची आठवण करून दिली. ज्योति आसटकर सुलू, मालती, संध्या, पांडू, राणू, सगुणा.... सुलुचे वेगळेपण त्यातच आहे, प्रत्येक पायवाटेवर स्त्रीला किंमत चुकवावीच लागते पण ती पायवाट स्वतः तयार केली असेल तर त्या रस्त्यावर ती समाधानाने पावलं टाकत जाते.... साम ही अशीच स्वतःचा रस्ता तयार करणारी व त्यावर स्वतःच लुप्त होऊन जाणारी खर तर माणसाचा जन्म जंजाळातच सुरू होतो म्हणल तर जंजाळ ते जंजाळ बाजूला करून स्वच्छ नजरेने जीवनाकडे पाहिलं तर आयुष्य हे खूप वेगळे आहे, त्याचे धागेदोरे चिवट असतात हेच जंजाळ वाचताना जाणवून गेले.. स्त्रीने स्वतःच आत्मभान जपत आव्हाने पेलणे हे मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये खूप कमी दिसते पण तुम्ही ती जपलेत व निभावले. माधवी देवळाणकर
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9788195312481
Release date
Audiobook: 23 December 2021
English
India