Step into an infinite world of stories
4.1
Non-Fiction
आयुष्यातील सर्व कोडी कुण्या पुस्तकात उलगडून सांगितली आहेत ! जसे की यशस्वी जीवनाचा मंत्र, अभ्यासातील आणि नित्यकर्मांतील एकाग्रता अभंग राहण्याचा मार्ग, प्रेमाची नाती सांधणारा पूल. आणि अजूनही प्रश्नमालिका बाकी आहेच - मी कोण आहे? जीवन म्हणजे नेमके काय... ? "ट्रंक कॉल टू कृष्णा" म्हणजे डॉ. गौरी जोशी यांच्या फेलोशिप ऑफ द फ्लूटच्या भागांमधील निरूपणांचा संग्रह आहे. या निरूपणांमध्ये रंजक गोष्टी आणि सत्यकथांची विपुलता आहे ज्यांमधून वाचकाला स्वतःच्या समस्यांचे समाधान शोधणे सहजसाध्य होईल. थोडक्यात तुमच्यातील सर्जनशील विचारक्षमता आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वृद्धिंगत होईल. शिवाय या पुस्तकात काही सहज आणि सोपे मनाचे व्यायाम अनुभवांतून मांडलेले आहेत ज्यामुळे शारीरिक आणि भावनिक स्वास्थ संतुलित राहील. तणावमुक्त जीवनासाठी श्रीमद्भग्वद्गीतेतील दाखल्यांची दिलेली जोड आत्मविश्वास जागृत करील. सरते शेवटी, कष्टाविना मोक्षप्राप्तीचा मनोहर मार्ग म्हणजे हे पुस्तक आहे. WE ARE HAPPY TO ACKNOWLEDGE THE CONTRIBUTION OF BANSURI MAESTRO * RAJENDRA TEREDESAI* WHO HAS PLAYED THE FLUTE IN THIS AUDIO BOOK.
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051059
Release date
Audiobook: 3 February 2022
Tags
English
India