Step into an infinite world of stories
5
Religion & Spirituality
बुध्दिनिष्ठ निबंध- वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावामागे जितक्या स्वाभाविकपणे "स्वातंत्र्यवीर' ही बिरुदावली लावली जाते, तितक्याच सहजपणे अन्यही अनेक विशेषणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतात. कट्टर राष्ट्राभिमानी, प्रतिभावन्त साहित्यिक, बुध्दिमान विचारवंत, निरलस-स्वार्थत्यागी देशभक्त, संवेदनशील कवी, ... या साऱ्या विशेषणांबरोबरच "निखळ विज्ञाननिष्ठ' याही शब्दांत सावरकरांचे वर्णन केले जाते. सनातन हिंदुधर्माचे कडवे अभिमानी असूनही बावनकशी विज्ञाननिष्ठांची जोपासना या दोन बाबींमध्ये विरोधाभास असल्याचा भ्रम अनेकदा सावरकरांच्या संदर्भात हेतुपूर्वक निर्माण केला जातो. मुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची व्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती? हे समजून घेतले की, सावरकरांच्या विचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे भक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणे, शोधक-जिज्ञासू वृत्तीचा अंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता बाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील. मात्र यातल्या कोणत्याही एका बाबीचा- अगदी बुध्दिवादासकट-एकात्मिक दुराग्रहसुध्दा वैज्ञानिकतेला अंतिमत: बाधाच उत्पन्न करणारा ठरतो, याचे भान बाळगले पाहिजे.
Release date
Audiobook: 21 November 2024
English
India