Step into an infinite world of stories
4.3
Religion & Spirituality
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे जन्मजात देशभक्त, स्वदेशीचा पुरस्कर्ता, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, थोर संघटक, आग्रही आणि सक्रीय समाजसुधारक, गतकाळातील घटनांचे संकलन करून स्फूर्तिदायक ग्रंथ लिहिणारा इतिहासकार, नवनवीन शब्द देणारा भाषाशास्त्रज्ञ, द्रष्टा राजकारणी, ओजस्वी वक्ता आणि प्रतिभाशाली साहित्यिक, अशा अनेकविध गुणांच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन केवळ देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्य यांसाठी झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या हिंदूत्व या पुस्तकातून हिंदू धर्माबाबतचे त्यांचे विचार प्रतिपादित केले आहेत. सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला पितृभू आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू. मग तो कुठल्याही जाती, धर्माचा का असेना. मूळात हिंदू हा केवळ एक धर्म नाही, तर ती एक जीवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष आणि अनन्य नाव नसून, ज्या अनेक धर्मांची तसेच पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी व पुण्यभूमी आहे, त्या सार्यांना समावेश करणा-या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे, इतकी सोपी व्याख्या सावरकरांनी हिंदुस्थानाची केल्याचे आढळते.
Release date
Audiobook: 21 November 2024
English
India