Step into an infinite world of stories
2
Religion & Spirituality
सावरकरांनी आयुष्यात परकीय गुलामगिरीविरुद्ध झगडण्यात आपली शक्ती पणाला लावली. रत्नागिरीला स्थानबद्ध झाल्यावर समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, जाचक, अन्यायी परंपरा, अंधश्रद्धा यांच्या निर्मूलनासाठी कार्य करण्याचे ठरवले. स्पृश्य-अस्पृश्यता, समाजातील विषमता, वर्णभेद सावरकरांना अस्वस्थ करू लागले. देशस्वातंत्र्याइतकेच समाजस्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे. आपल्या लेखणीतून नि वाणीतून समरसतेचा विचार मांडण्याचा निर्धार केला. संस्कृती राखण्यासाठी हिंदू समाजाचे संघटन करून त्यांच्यामध्ये लढाऊ वृत्ती, स्वाभिमान निर्माण करण्याचा ध्यास घेतला. निद्रिस्त समाजाला जागृत करणे हे काम तितके सोपे, सहज नव्हते. जातिभेदाच्या शृंखला तोडून त्यांची मानसिकता बदलणेे कठीणच होते. पण सावरकर निश्चयी होते. समाजजागृतीचा विचार त्यांच्या बालपणीच त्यांच्या हृदयात घर करून होता. त्यांच्या सामाजिक भाषणांतून त्यांचे सामाजिक विचार व्यक्त होतात.
Release date
Audiobook: 24 November 2024
English
India